अनेक संधी नोकरीच्या - औरंगाबाद

Jobs in
Jobs in Aurangabad Jan 05, 2019

महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागातील एक प्रमुख जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा. प्रत्येक शहराची आपली अशी काही वैशिष्ट्ये असतात. महाराष्ट्रामध्ये अनेक दृष्ट्या महत्वाचे असणारे औरंगाबाद शहर विविध गोष्टींसाठी आपली विशेष ओळख राखून आहे. औरंगाबाद येथे मराठवाडा विभागाचे मुख्यालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठही आहे. चारही बाजूंनी टेकड्या व डोंगरांनी वेढलेले हे शहर इतिहासातही आपले विशेष स्थान राखून आहे. 'महाराष्ट्रातील पर्यटनाची राजधानी' म्हणून ओळखले जाणारे औरंगाबाद, पर्यटन क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देते. आज जगातील सर्वाधिक वेगाने वाढणार्‍या औद्योगिक शहरांमध्ये औरंगाबाद शहराचा उल्लेख प्राधान्याने केला जातो. विकासाच्या मार्गावर आघाडीवर असणार्‍या औरंगाबादमध्ये असणारी उद्योगांची विपुलता अर्थातच अनेक जणांना रोजगार, नोकर्‍या पुरविते. सन १८८९ मध्ये येथे पहिली कापूस प्रक्रिया गिरणी सुरू झाली व त्यावेळी यामधून सुमारे सातशे जणांना रोजगार उपलब्ध झाला. १९ व्या शतकात येथे अनेक जिनिंग कारखाने सुरू झाले तसेच औरंगाबाद महाविद्यालयाची स्थापनाही झाली. याद्वारे शिक्षण व उद्योग - व्यवसायामध्ये होणारी वाढ ही रोजगार निर्मितीसाठी पूरक ठरू लागली. आज येथे यशस्वीरीत्या चालू असणार्‍या विविध उद्योगांमार्फत अनेक तरुणांसाठी रोजगाराच्या नवनव्या संधी उपलब्ध होत आहेत.

आपल्या उपजीविकेचे, उत्पन्नाचे साधन म्हणून नोकरीकडे पाहिले जाते. तरुण वर्ग आजही Job शोधताना प्रामुख्याने सरकारी नोकरी शोधण्यास प्राधान्य देताना दिसतो. सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षितता अशी एक सर्वसाधारण समजूत आपल्याला जनमानसात दिसून येते. सुरक्षित आणि नियमित उत्पन्न मिळवून देणारा Job मिळणे हे महत्वाचे तर आहेच, परंतु यासाठी आपला दृष्टीकोन थोडा व्यापक ठेवणेही गरजेचे आहे. जर आपण Aurangabad मधील jobs चा विचार करीत असू तर अर्थातच येथे सरकारी नोकर्‍यांसह Private Sector मध्येही उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. याचसाठी आपल्या सोबत आहे Jobs in Aurangabad!

औरंगाबादमधील तरुणांना आपल्या शहरात, जिल्ह्यात उत्तम jobs शोधता यावे यासाठीच या पोर्टलची निर्मिती झाली आहे. जॉब शोधत असताना आपले शिक्षण, आपली कौशल्ये, एखाद्या विषयातले आपले प्रावीण्य यांचा साधकबाधक विचार करून आपल्या योग्य जॉब शोधणे सोपे व्हावे यासाठी हे पोर्टल आपल्याला सहाय्य करते. केवळ सरकारी नोकरीच हवी असा अट्टहास न ठेवता तरुणांनी आपल्या कक्षा विस्तारत नोकरीच्या विविध पर्यायांचा विचार करायला हवा. औरंगाबादमधल्या विविध क्षेत्रातील, विविध इंडस्ट्रीजमधील नोकरीच्या संधी जाणून घेण्यासाठी Jobs in Aurangabad येथे अवश्य रजिस्टर करा.   

 

Written By

Jobs in
Jobs in Aurangabad Jan 05, 2019